रत्‍नागिरी

रत्नांची खाण

रत्‍नागिरी जिल्ह्याला १६७ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून इथले शुभ्र, रुपेरी वाळूचे सुंदर किनारे पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात. उत्तुंग सह्याद्री पर्वतात उगम पावून केवळ ३० ते ४० किलोमीटर अंतर कापून समुद्रास मिळणाऱ्या नद्यांच्या मार्गावर भौगोलिक जडण घडणी मुळे निर्माण झालेले निसर्गाचा सुंदर आविष्कार असणारे अनेक विलोभनीय धबधबे रत्नागिरीपरिसरांत आढळतात. रत्नागिरीचा संपूर्ण परिसर येथे आढळणाऱ्या अनेक निसर्गनिर्मित आणि मानव निर्मित आश्चर्यांसाठी प्रसिध्द आहे. सह्याद्रीच्या भर माथ्यावर अनेक भक्कम गिरीदुर्ग तसेच कोकणकिनाऱ्याचे रक्षणकर्ते असलेले अनेक सागरीदुर्ग फार प्राचीन काळापासून उभे आहेत.

वाट कसली पाहताय... चला!

१ दिवसाची सफर
५ निसर्गरम्य मंदिरे
५ समुद्रकिनारे

जिथे सागरा धरणी मिळते...

पवित्र स्थळे

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक प्राचीन, पुरातन व सुंदर मंदिरांचं शतकांनुशतकं अस्तित्व आहे. हजारो वर्षांपासून पूर्वापार चालत आलेल्या परंपरा व श्रध्देमुळे आजही येथली अनेक मंदिरे भाविकांच्या मनांत आपले स्थान टिकवून आहेत. 

जलप्रपात

रत्नागिरी जिल्ह्यांतील अंतर्गत भागात खोर निनको, देवपाट, धामापूरचा धबधबा असे अनेक सुंदर धबधबे पाहून पावसाळी पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेता येतो. 

रक्षणकर्ते दुर्ग

उत्कंठावर्धक

जैवविविधता

रत्नागिरी... एक अविस्मरणीय मुशाफिरी.

Positive SSL