ग्रीक भाषेत ‘पेट्रोग्लिफ’ या शब्दाचा अर्थ खडकावर केलेले कोरीवकाम असा होतो. ही संज्ञा जरी लेण्यांमधील शिल्पकलेसाठी समर्पक असली तरी ती कोकणातील आदिमानवाने सुमारे १०,००० वर्षांपूर्वी कठीण कातळावर कोरलेल्या शिल्पकलेलाही तितकीच लागू होते. रत्नागिरीत अनेक ठिकाणी जाभ्यांच्या संपूर्ण उघड्या व विस्तीर्ण सड्यांवर कोरलेली ही कातळशिल्पं किंवा खोदचित्रे हे इथलं चुकवू नये असं एक खास वैशिष्ट्य.

विविध प्राणी, पक्षी, अगम्य भौमितिक रचना, अनाकलनीय चित्रलिपी असणारी ही खोदचित्रे हे एक गूढ असले तरी तो एक मानवनिर्मित सुंदर आविष्कार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांत जवळपास दोनशेऐंशी पेक्षा जास्त कातळशिल्पं सापडली आहेत. या गूढरम्य आकृत्या इथे कोणी व का कोरल्या? त्यांचा उद्देश काय? त्यातून त्या प्राचीन मानवाला काय अभिप्रेत होते? याची अधिकृत माहिती आज जरी उपलब्ध नसली तरी त्यावर अभ्यासकांचे अधिक संशोधन चालू आहे. 

या खोदचित्रांबद्दल स्थानिक लोकांमध्ये अनेक दंतकथा प्रचलित आहेत. अनेक ठिकाणी हत्ती आणि वाघ या प्राण्यांचे आकार हे जिवंत प्राण्याच्या आकाराएवढे खोदलेले दिसतात. त्याचबरोबर मगर, कासव आणि मासे, साप यांची चित्रे सुद्धा आढळतात. सर्व खोदचित्रांमध्ये मानवीचित्रे तुलनेने जास्त आढळतात.  उत्साही संशोधक सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी चिकाटीने या खोदचित्रांचा अभ्यास केला असून त्यांची एक विभागवार सूची तयार केली आहे. त्यांच्यामध्ये आढळणारे साम्य आणि विविधता यांचीसुद्धा बारकाईने नोंद केलेली आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

नवरात्र

चला तर मग!

मामाचं गाव, तुरळ

चला तर मग!

महर्षी कर्वे स्मृती स्मारक, मुरुड

चला तर मग!
Positive SSL