राजापूरची गंगा ही अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते. राजापूरच्या उन्हाळे गावातून गंगातीर्थाकडे जाण्याचा रस्ता आहे.

तालुका - राजापूर

बस स्थानक - राजापूर

रेल्वे स्थानक - राजापूर रस्ता

योग्य काळ - वर्षभर 

गंगातीर्थाच्या चिरेबंदी घाटावर गंगेची चौदा कुंडं असून गंगा प्रकट होताच ही कुंडं भरून वाहू लागतात. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काशी कुंड असून त्याशेजारील मोकळ्या जागेत वटवृक्षाखाली मूळ कुंड आहे.

येथील अजून एक आश्चर्य म्हणजे पाण्याला गंधकाचा वास येतो व प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे असते. इथल्या कुंडांना वरूण, हिरा, वेदिका, नर्मदा, सरस्वती, गोदा, यमुना, कृष्ण, अग्नी, चंद्र, सूर्य व बाणकुंड अशी वेगववेगळी नावे असून त्यातील काशी कुंड सर्वात मोठे आहे. भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी इथे उत्पन्न होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. येथे गंगा स्नानाचीही व्यवस्था आहे. गंगा प्रकट झाल्यावर राजापूरच्या गंगेला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते.

अनुभवण्यासारखे खूप काही

सरपटणारे व उभयचर प्राणी

चला तर मग!

सुवर्णदुर्ग, दापोली

चला तर मग!

श्री दशभुजा गणेश, हेदवी

चला तर मग!
Positive SSL