कोटजाई व धाकटी नद्यांच्या संगमावर दापोलीतील पन्हाळेकाजी येथे २९ लेण्यांचा प्राचीन समूह शतकानुशतकं आपले गतवैभव सांभाळत उभा आहे. दापोली तालुक्यात डोंगराळ भागांतून २० कि.मी. प्रवास केल्यावर दापोली– दाभोळ रस्त्यावर नानटे गावाजवळ पन्हाळेकाजी या लेण्यांचा अप्रतिम आविष्कार पाहायला मिळतो. हा लेणी समूह खोदण्याची सुरुवात दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात झाली असून ती पुढे अनेक शतकं चालू असावी असे मानले जाते.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - वर्षभर 

पन्हाळेकाजी ही प्राचीन लेणी १९७० साली दाभोळचे इतिहासप्रेमी श्री. अण्णा शिरगांवकर यांच्यामुळे प्रकाशझोतात आली. पन्हाळेकाजी गावांत त्यांना १२ व्या शतकातील ताम्रपट सापडला ज्याच्या अनुषंगाने हे ठिकाण शोधण्यात आले. आता हे ठिकाण पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असून एकूण २९ गुंफा असलेली ही लेणी व त्यातील अप्रतिम शिल्पकलेचा नमुना पाहाण्यासाठी हातात भरपूर अवधी हवा.

येथील नोंद घेण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे हीनयान बौध्द पंथ, वज्रयान पंथ आणि नाथ पंथ अशा विविध पंथांतील शिल्पांबरोबरच गणपती, लक्ष्मी, शिव, सरस्वती आदी देवतांच्या मूर्तीही इथे आढळतात. गेल्या हजार वर्षांचा आपला गौरवशाली इतिहास जपणारी पन्हाळेकाजी लेणी हे अतिशय शांत व रमणीय ठिकाण पर्यटकांना एका वेगळ्याच विश्वाची अनुभूती देऊन जातं.

अनुभवण्यासारखे खूप काही

खारफुटीची जंगले (खाजण)

चला तर मग!

टिकलेश्वर मंदिर, देवरुख

चला तर मग!

नितांत सुंदर जांभरूण

चला तर मग!
Positive SSL