अतिशय अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेल्या उन्हवरे गावात चुकवू नये असं एक निसर्गनवल आहे. दापोली तालुक्यातील दाभोळपासून २३ किमी अंतरावर असलेल्या फणसू गावाजवळील वाकवलीजवळ तसेच खेडपासून १५ किमी अंतरावर हे ठिकाण आहे.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली/खेड

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - वर्षभर 

एका पाठोपाठ एक अशा तीन कुंडांमधे हे पाणी आणले जाते. जमिनीखालून वाहणाऱ्या गरम पाण्यामुळे जमिनीचा पृष्ठभागही पावलांना गरम लागतो. उष्णतेमुळे झऱ्याजवळ आपण मिनिटभरापेक्षा जास्त वेळ उभे राहू शकत नाही.

या गंधकयुक्त पाण्यात चर्मरोग बरे करण्याचा गुणधर्म असून तेथे भाविकांसाठी व पर्यटकांसाठी स्नानाचीही व्यवस्था आहे. या गरम पाण्याच्या कुंडालगतचा परिसर खूप रम्य आहे. समोरचा निसर्ग, डोंगरावरील महादेव मंदिर, जवळची खाडी, मदरसा, हिरवीगच्च झाडी अशा निसर्गरम्य परिसरात वसलेली उन्हवरेची गरम पाण्याची कुंडं जरूर भेट द्यावीत अशीच आहेत.

अनुभवण्यासारखे खूप काही

श्री क्षेत्र परशुराम, चिपळूण

चला तर मग!

थिबा पॅलेस, रत्नागिरी

चला तर मग!

कातळशिल्पं (खोदचित्रे)

चला तर मग!
Positive SSL