चिपळूण तालुक्यातील बारमाही वाहणारा धबधबा म्हणजे वीर देवपाटचा धबधबा असून तो दोन टप्प्यांत पडतो. तुंबरव येथून १० कि.मी. अंतरावरील वहाळ गावापासून वीर बंदराजवळ जाता येतं. देवपाटच्या धबधब्याकडे जाण्याचा रस्ता तिथूनच जवळ असलेल्या पोफळीच्या दाट झाडीतून जातो.

तालुका - चिपळूण

बस स्थानक - सावर्डे

रेल्वे स्थानक - चिपळूण

योग्य काळ - जुलै ते फेब्रुवारी

वीर गावात पोहोचता पोहोचता धबधब्याचा नाद अखंड ऐकू येत असतो, मात्र दाट झाडी पार केल्याशिवाय धबधब्याचं दर्शन होत नाही. काळ्या कातळांमधून खालच्या डोहात त्याचा अव्याहत प्रवाह कोसळत असतो. खालच्या डोहांत जलक्रीडेचा मनसोक्त आनंद घेता येऊ शकतो.

इथल्या आसपासच्या झाडांवरची माकडेही अधेमधे आपलं अस्तिव जाणवून देतात. गावकऱ्यांना अधूनमधून होणारं बिबट्या वाघाचं दर्शन हे इथल्या वैभवसंपन्न जंगलाचं द्योतक आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

सुवर्णदुर्ग, दापोली

चला तर मग!

गणपतीपुळे समुद्रकिनारा

चला तर मग!

श्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर

चला तर मग!
Positive SSL