कोकणात गेल्यावर अनेक ठिकाणांबद्दल वेगवेगळ्या गमतीदार कथा ऐकायला मिळतात. किंबहुना त्या सुरस दंतकथांमुळेच ही ठिकाणं बऱ्यांचदा लक्षात राहतात. सवतसडा हे नाव तसं कानाला वेगळं वाटतं आणि अशा वेगळ्याच नावाचा जर धबधबा असेल तर उत्सुकता जास्तच वाढते.

तालुका - चिपळूण

बस स्थानक - चिपळूण

रेल्वे स्थानक - चिपळूण

योग्य काळ - जुलै ते ऑक्टोबर  

चिपळूण गावापासून अगदी जवळ म्हणजे ५ किमी अंतरावर हा सवतसडा कडा व त्यावरून पावसाळ्यात पडणारा हा सुंदर धबधबा आहे. मुंबईकडून चिपळूणला येताना महामार्गाच्या डाव्या बाजूला हा धबधबा उंचावरून कोसळताना दिसतो. सवतसड्याच्या धबधब्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी शनिवार-रविवार येथे पर्यटकांची गर्दी असते. जुलै ते ऑक्टोबर या काळात धबधब्याला भरपूर पाणी असते. मात्र पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह खूप जोरात वाहात असल्याने इथे वावरताना काळजी घेणे योग्य. येथे पर्यटकांसाठी धबधब्यापर्यंत जाण्याकरता पाऊलवाट असून विश्रांतीसाठी शेडची सोय करण्यात आली आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

पूर्णगड, रत्नागिरी

चला तर मग!

ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन

चला तर मग!

चुना कोळवणचा धबधबा, राजापूर

चला तर मग!
Positive SSL