रत्नागिरीतील अजून एक असाच सुंदर धबधबा म्हणजे रानपाटचा धबधबा. पावसाळ्यातील कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे नजरेला एक पर्वणीच असते. हिरवा शालू पांघरलेल्या सह्याद्रीच्या गर्द धुक्यात लपेटलेल्या डोंगररांगांतून वाट काढता काढता `कोकणच्या राणीच्या` प्रवासात इतकं काही बघण्यासारखं असतं की दोन डोळे अपुरे वाटू लागतात.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - संगमेश्वर

रेल्वे स्थानक - संगमेश्वर

योग्य काळ - जुलै ते ऑक्टोबर

मुंबईहून कोकणरेल्वेने रत्नागिरीला येताना प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात उक्षी स्थानक लागते. ते सोडून पुढे गेल्यावर उजवीकडे उंचावरून कोसळणा-या या धबधब्याचं दर्शन होतं. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरच्या पुढे उक्षी गावाचा रस्ता आहे. या रस्त्याने पुढे रानपाट गावापर्यंत वाहनाने जाता येते. गावापासून चालत जाण्याच्या अंतरावर हा धबधबा आहे. या धबधब्या भोवती असलेली हिरवाई व उंचीवरून पडणारा रानापाटचा धबधबा पाहून निसर्गापुढे आपण किती लहान आहोत याची जाणीव होते. धबधब्याचा आनंद लुटताना मात्र जवळच असलेल्या रेल्वे रुळांवर न थांबणे इष्ट.

अनुभवण्यासारखे खूप काही

आरे-वारे समुद्रकिनारा

चला तर मग!

मांसाहारी

चला तर मग!

नाटेश्वर मंदीर – नाटे

चला तर मग!
Positive SSL