पावसाळा सरू झाला की उन्हाची तलखी जरा सुसह्य होऊ लागते. हिरव्या मऊशार गवताचे कोंब डोंगरवाटांवर डोलू लागले की मनाला ओढ लागते ती सह्याद्रीची. त्या हिरव्या वनराईतून, उंच डोंगरकड्यांवरून लोटणाऱ्या शुभ्र जलधारा पाहण्यासाठी डोळे आसुसलेले असतात.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - रत्नागिरी

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - जुलै ते ऑक्टोबर  

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरजवळची बाव नदी ओलांडल्यावर निवळी घाट लागतो. हिरव्या गर्द झाडीला चिरत, फेसाळत खाली येणारा एक धबधबा आपल्याला घाटात थांबायला भाग पाडतो. तिथे रस्त्याच्या कडेला उभे राहून निवळीचा हा सुंदर धबधबा पाहून डोळे निवतात. श्रावणांत धबधब्यावरून आणि जंगलावरून उन्हाचे कवडसे पाडत ढग माथ्यावरून वेगाने पुढे सरकत असतात.

डोंगरावरच्या दाट हिरव्या झाडीतून टप्प्याटप्प्याने कोसळणारा निवळी धबधबा खूप सुंदर आहे. घाटातून पुढे रत्नागिरीच्या दिशेने गेल्यावर धबधब्याजवळ जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत, त्यांना पाखाडी असं म्हणतात. धबधब्याला पाणी कमी असताना येथे जलक्रीडेचा आनंद घेता येतो. मात्र हा आनंद घेताना सावधानता बाळगणंही गरजेचं आहे. रत्नागिरी ते निवळी धबधबा हे अंतर फक्त १८ किमी आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

वेळणेश्वर मंदिर, गुहागर

चला तर मग!

श्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर

चला तर मग!

सरपटणारे व उभयचर प्राणी

चला तर मग!
Positive SSL