पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं आणि टप्प्याटप्प्याने पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित सुंदर धबधबा भान हरपून टाकतो. ऐन पावसाळ्यांत इथल्या डोंगरात कोरलेल्या सांडव्याच्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी किती सुंदर दिसेल अशी कल्पना करून ज्याने कुणी हा सांडवा इथे बांधला त्याच्या सौंदर्यदृष्टीची दादच द्यायला हवी.

तालुका - लांजा

बस स्थानक - लांजा

रेल्वे स्थानक - राजापूर रस्ता

योग्य काळ - जुलै ते ऑक्टोबर  

राजापूर-साखरपा रस्त्यावर लांजा तालुक्यामधे भांबेड गावापासून १२ किमीअंतरावर एका निसर्गरम्य ठिकाणी लघु पाटबंधारे विभागाने हे मातीचं धरण बांधलं आहे. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या धरणाला दरवाजे नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात पायऱ्यांवरून एका संथ लयीत पडणाऱ्या धबधब्याच्या असंख्य शुभ्र जलधारा बघणं हा कधीही विसरता न येणारा अनुभव असतो. सांडव्याच्याकडेने वर धरणाच्या भिंतीवर पोहोचलं की समोर दिसणारं दृश्य स्तिमित करतं. धुक्याने वेढलेल्या सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा आणि सौंदर्याने ओथंबलेल्या इथल्या निसर्गाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.

धबधब्याच्या पाण्याच्या भिंतींमध्ये अक्षरशः आरपार घुसून मासे पकडणाऱ्या इथल्या स्थानिक मच्छीमारांना बघणं हा एक मजेशीर अनुभव असतो. स्वच्छ वातावरणांत हवेत धुकं नसलं की विशाळगडाच्या पायथ्याशी असलेला लोखंडी पूल खोरनिनको धरणाच्या भिंतीवरून दिसू शकतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

मत्स्यालय, रत्नागिरी

चला तर मग!

गरम पाण्याची कुंड, तुरळ

चला तर मग!

नाटेश्वर मंदीर – नाटे

चला तर मग!
Positive SSL