रत्नागिरीतील संगमेश्वर तालुका सह्याद्रीच्या अगदी कुशीत वसला आहे. देवरुखपासून १८ किमी अंतरावर डोंगरातील निसर्गरम्य ठिकाणी श्री मार्लेश्वर देवस्थानाजवळचा धारेश्वर धबधबा डोळ्यांचं पारणं फेडणार आहे. सहस्र धारांनी खाली कोसळणारा म्हणून हा आहे धारेश्वर धबधबा.

तालुका - संगमेश्वर

बस स्थानक - देवरुख

रेल्वे स्थानक - संगमेश्वर

योग्य काळ - जुलै ते फेब्रुवारी

पावसाळ्यात सुमारे दिड हजार फूट उंचीवरून सात टप्प्यांमध्ये कोसळणाऱ्या मार्लेश्वरच्या जलप्रपाताने हजारो वर्षात सह्याद्रीचा भक्कम कातळ अगदी चिरून काढलाय. हे कोरीव काम बघण्यासाठी मार्लेश्वराच्या समोरच्या डोंगरावर साहसी चढाई करायला हवी.

या अजस्र धबधब्याचं रौद्र रूप जेवढं स्तिमित करतं तेवढचं ते छातीत धडकी भरवणारं असतं. मार्लेश्वरच्या धारेश्वर धबधब्याचा थरार अनुभवण्यासाठी कोसळत्या पावसात मार्लेश्वरला जरूर भेट द्यायला हवी.

अनुभवण्यासारखे खूप काही

बुधल सडा

चला तर मग!

पंखांवरचे भरारते जग

चला तर मग!

सायकलिंग व बायकिंग

चला तर मग!
Positive SSL