रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या खोलवर शिरलेल्या डोंगरांगांतून अनेक आश्चर्ये दडलेली आहेत. सह्याद्रीतील अवघड वाटांवर वनभ्रमण व गिरीभ्रमणाची आवड असणाऱ्यांसाठी संगमेश्वर तालुक्यातील धामापूर गावाजवळील धबधबा हे वर्षा पर्यटनासाठी आदर्श ठिकाण आहे.

तालुका - संगमेश्वर

बस स्थानक - संगमेश्वर

रेल्वे स्थानक - संगमेश्वर

योग्य काळ - जुलै ते ऑक्टोबर

धामापूर गावापासून धबधब्याकडे निघालेली वाट जंगलातून खळाळत वाहणाऱ्या एका ओढ्याशेजारून पुढे जाते. स्वच्छ, प्रदूषणरहित अशा निरोगी पर्यावरणाची साक्ष देणारी लायकेन्स, रानफुलं, दुर्मिळ फुलपाखरं, विविध प्रकारचे कीटक या जंगलवाटेवरून जाताना दिसू शकतात.

सगळीकडे फक्त हिरव्या रंगानेच व्यापून टाकणाऱ्या गर्दपोपटी आणि पाचूच्या हिरव्या छटा दिसत असतात. जंगलवाट पार करून गेलं की समोर येतो तो धामापूरचा स्फटिकासारखा शुभ्र धबधबा. धामापूर गावातून एक ते दोन कि. मी. कच्चा रस्ता आहे. त्यापुढे मात्र सुमारे चाळीस मिनिटे पायी जावे लागते. रत्नागिरी जिल्ह्याच्या वर्षा पर्यटनस्थळांच्या यादीत धामापूरचा नितांत सुंदर धबधबा भरच घालतो यात शंका नाही.

अनुभवण्यासारखे खूप काही

प्राचीन कोकण दालन, गणपतीपुळे

चला तर मग!

श्री चंडिकादेवी मंदिर, दाभोळ

चला तर मग!

गिरीभ्रमण

चला तर मग!
Positive SSL