रत्नागिरीची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. जमिनीचा उंच सखलपणा, दऱ्या, डोंगर, जांभ्याचे सडे अशी जिल्ह्याची रचना असून रत्नागिरीतील अनेक नैसर्गिक आश्चर्ये अजून गुलदस्त्यातंच आहेत. पण जेव्हा असं एखादं निसर्गनवल नव्याने समोर येतं तेव्हा त्या ठिकाणाला भेट देण्याची उत्सुकता स्वस्थ बसू देत नाही.

तालुका - राजापूर

बस स्थानक - राजापूर

रेल्वे स्थानक - राजापूर रस्ता

योग्य काळ - जुलै ते ऑक्टोबर  

रत्नागिरीतील राजापूरजवळ असा नव्यानेच माहिती झालेला चुना कोळवणचा अतिशय सुंदर धबधबा आहे. राजापूरच्या उत्तरेस १६ किमी अंतरावर मांडरूळ-झरेवाडी फाट्याने जंगलात साधारण ५ किमी अंतरावर एक उंच असा अर्धवर्तुळाकार कडा आहे. त्यावरून सुमारे सव्वाशे फूट खोल दरीत चुना कोळवणचा धबधबा प्रचंड पाणपसारा घेऊन उंचावरून खाली झेपावतो.

पावसाळ्यात असंख्य धारांनी पडणाऱ्या चुना कोळवणचे सौंदर्य रौद्रभीषण भासतं. उंचावरून पडणाऱ्या या धबधब्याखाली एक डोह असून पाऊस कमी झाल्यावर गेल्यास खालच्या डोहांत जलक्रीडेचा मनमुराद आनंद घेता येतो. तिथे उभे राहून अंगावर उडणारे तुषार व जलधारा झेलत वेळ कसा जातो ते कळतंच नाही. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे पण पावसाळा संपतासंपता जवळच्या रानवाटेनं रमतगमत जात इथे भेट देता येते. वर्षापर्यटनाचा इथे भरपूर आनंद घेता येतो. धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी गावापासून रस्ता असून शेवटचा ४ कि.मी.चा रस्ता हा कच्चा असला तरी तिथपर्यंत गाडी जाऊ शकते.

अनुभवण्यासारखे खूप काही

रसाळगड, खेड

चला तर मग!

वेळासचा समुद्रकिनारा

चला तर मग!

वेत्ते समुद्रकिनारा

चला तर मग!
Positive SSL