कोकणाचं एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारे अनेक दर्गे व मशिदी. हजारो हिंदू व मुसलमान भाविकांच्या मनात या दर्ग्‍यांप्रति श्रध्दा असून येथे होणार्‍या ऊरुसांमधे ते भक्तीभावाने सहभागी होत असतात. केळशीमधील `हजरत याकूतबाबा सरवरी रहमतुल्ला दर्गा’ हा एक असाच इतिहासप्रसिध्द दर्गा असून तो ३८६ वर्षे जूना आहे.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - वर्षभर 

याकूतबाबा ज्यांना याकूबबाबा असंही संबोधलं जातं ते १६१८ साली हैद्राबाद सिंध प्रांतातून बाणकोटमार्गे केळशीला पोहोचल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून याकूतबाबा यांचे केळशीत वास्तव्य होते व त्यांच्या धर्मनिरपेक्ष आचरणातून त्यांनी जनमानसाच्या मनांत स्थान मिळविले. 

दरवर्षी ६ डिसेंबर रोजी येथे मोठा उरूस असतो. हजारोंच्या संख्येने बाबांचे हिंदू व मुसलमान भक्त या दर्ग्यावर येतात. याकूतबाबांचं जीवन, त्यांचे आचरण आणि बाबांवर श्रध्दा असणारे त्यांचे भक्त पाहिले की कुठल्याही जातीधर्मापेक्षा माणूसधर्म कधीही श्रेष्ठ असतो हीच भावना इथे आल्यावर जाणवते.  

छत्रपती शिवाजीमहाराजांची दाभोळ मोहिमेची तयारी चालू असताना त्यांची व याकूतबाबांची भेट झाली होती असे सांगितले जाते. महाराजांनी केळशीत या ठिकाणी दर्गा बांधण्याची इच्छा व्यक्त केली.त्याप्रमाणे एका दगडी चौथऱ्यावर अत्यंत रेखीव अशा मुसलमानी पद्धतीच्या कमानी बांधून दर्गा उभा राहिला. दर्ग्याच्या खर्चासाठी ५३४ एकर जमीन इनाम दिली गेली.

अनुभवण्यासारखे खूप काही

बंदरे

चला तर मग!

टिकलेश्वर मंदिर, देवरुख

चला तर मग!

मांसाहारी

चला तर मग!
Positive SSL