गुहागर गाव अगदी प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे ते इथल्या व्याडेश्वर मंदिरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे प्राचीन जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. `श्री व्याडेश्वर महात्म्य` या संस्कृत पोथीनुसार व्याडेश्वराचे हे प्राचीन देवालय १२ व्या शतकात बांधले असावे परंतु येथील शिवलिंगाची उत्पत्ती मात्र प्राचीन आहे

तालुका - गुहागर

बस स्थानक - गुहागर

रेल्वे स्थानक - चिपळूण

योग्य काळ - वर्षभर 

श्री व्याडेश्वर देवस्थान हे शिवपंचायतन आहे. ज्या ठिकाणी शिवाच्या मंदिराबरोबर इतरही देवांची मंदिरे असतात त्याला शिवपंचायतन म्हणतात. मंदिराच्या चारही कोपऱ्यात प्रत्येक दिशेला गणपती, दुर्गादेवी, लक्ष्मीनारायण आणि सूर्यनारायणाची स्वतंत्र मंदिरे आहेत. या सर्व मूर्ती सुंदर असून त्या संगमरवरी आहेत. या प्राचीन मंदिरातील मुख्य गाभार्‍यात काळ्या पाषाणाचे शिवलिंग असून त्यावर सुरेख कोरीवकाम असलेल्या तांब्याच्या नागराजाची प्रतिमा आहे. पिंडीवर अभिषेक सुरू असतो व गोमुखातून अभिषेकाचे तीर्थ प्राशन करता येते.

मंदिराचे बांधकाम दगडी असून परिसराला दगडी तटबंदीसुध्दा आहे. समोरील भव्य सभामंडपात तेवढेच भव्य नंदीचे शिल्प आहे. याचबरोबर मंदिराच्या आवारात तीन दीपमाळा आहेत. भक्तांच्या मनातील अढळ श्रध्दास्थान असलेले व्याडेश्वर हे कोकणाच्या भटकंतीमधील एक चुकवू नये असे देवस्थान आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

चला तर मग!

गणेश मंदिर, गणेशगुळे

चला तर मग!

मासेमारी

चला तर मग!
Positive SSL