चिपळूणच्या रावतळे परिसरात विंध्यवासिनीचे मंदिर आहे. नंद-यशोदेची ही मुलगी जी कृष्णाच्या ऐवजी वासुदेव–देवकीच्या कोठडीत पोहोचली आणि तिला कंसाने ठार मारण्यासाठी उचलले असता ती त्याच्या हातातून निसटून विंध्यपर्वतावर जाऊन राहिली अशी पुराणकथा आहे.

तालुका - चिपळूण

बस स्थानक - चिपळूण

रेल्वे स्थानक - चिपळूण

ऋतू - सर्व ऋतू

विंध्यवासिनी देवीचे हे मंदिर बहुधा यादवकालीन असून देवी पुरातन काळापासून शाक्तपंथीयांना पूजनिय असावी. परकीयांच्या आक्रमणात येथील मूळ रहिवासी असलेल्या बाराराव या कोळी जमातीने आपल्या कुलदेवतेचं रक्षण करण्यासाठी तिचं संपूर्ण मंदिर डोंगर तोडून व दगड मातीचा ढीग रचून त्यात गाडून टाकलं. कालांतराने छत्रपती संभाजीमहाराजांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. त्याकाळापासून आजापर्यंत देवीची नित्य पूजाअर्चा चालू आहे.

१९७६ साली देवीच्या स्थापनेचा ३०० वा वर्धापनदिन साजरा झाला. देवीची मूर्ती होयसाळ शैलीची असून ती ८०० ते १००० वर्षे जुनी असावी. त्याचप्रमाणे मूर्ती अष्टभूजा असून महिषासुरमर्दिनी या आक्रमक रूपांत उभी आहे. तिच्या आठही हातांत आयुधे असून तिने पायाखाली रेड्याला दाबून धरले आहे. नवरात्रात इथे देवीचा मोठा उत्सव असतो. तिच्या गाभाऱ्यातील मयूर हे वाहन असलेया कार्तिकेयाची मूर्तीही अत्यंत देखणी आहे. या दोनीही मूर्ती अतिशय सुंदर असून त्यावरील सुबकता, कोरीव काम व काळ्या पाषाणाची आजही टिकून असलेली तकाकी पाहून त्या कारागिरांच्या कामगिरीचे कौतुक वाटते.

अनुभवण्यासारखे खूप काही

पन्हाळेकाजी लेणी

चला तर मग!

श्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर

चला तर मग!

लाडघर समुद्रकिनारा

चला तर मग!
Positive SSL