देवरुखजवळचं एक अप्रतिम देवस्थान म्हणजे टिकलेश्वर. सह्याद्रीच्या माथ्यावर खूप उंचीवरील एका शिखरावर टिकलेश्वर उभा आहे. दूरवर पसरलेला गच्च जंगलाने वेढलेला परिसर, आसपासच्या छातीत धडकी भरवणाऱ्या खोल दऱ्या असे सहयाद्रीचे रौद्रभीषण सौंदर्य टिकलेश्वराच्या डोंगरावर उभे राहून दिसू शकते. श्रध्दाळूंबरोबरच सह्याद्रीच्या अवघड दऱ्या-खोऱ्यांत भटकणाऱ्या ट्रेकर्स व गिर्यारोहकांना सुध्दा टिकलेश्वर परिसराचे खूप आकर्षण आहे.

तालुका - संगमेश्वर

बस स्थानक - देवरुख

रेल्वे स्थानक - संगमेश्वर

योग्य काळ - सप्टेंबर ते फेब्रुवारी 

टिकलेश्वराच्या मंदिरासमोर निवाऱ्यासाठी काँक्रीटचे छप्पर असलेली जागा आहे. शिखराच्या थोडे खाली उतरून प्रदक्षिणा मार्ग आहे. त्या पायवाटेवर काही गुहा व दगडात कोरलेले स्वच्छ पाण्याचे टाके आहे. डोंगराच्या शिखरावरून पूर्वेस मैमतगड दिसतो आणि मार्लेश्वराकडे जाणारी वाट दिसते.

टिकलेश्वरच्या पायथ्यापासून पदभ्रमण करत जाऊन येण्यास ५ ते ६ तासांचा अवधी लागतो. सकाळी ब्रेकफास्ट करून पायी फिरत फिरत गेल्यास टिकलेश्वर करून देवरूखला जेवायला परत येता येते.

 टिकलेश्वराच्या पायथ्याशी तलावडे हे गाव देवरूखपासून ४ कि.मी वर आहे. तिथून टिकलेश्वर डोंगर चढून जायला आता रस्ता केला आहे. गाडीनेही वरपर्यंत जाता येते. मात्र शेवटचा एक चतुर्थांश रस्ता हा पायवाटेचा असून अगदी उभ्या चढाचा दमछाक करणारा हा मार्ग आहे. पण असे दुर्गम रस्ते पदभ्रमणप्रेमींना कायमच आकर्षित करतात.

अनुभवण्यासारखे खूप काही

अंजनवेल, गुहागर

चला तर मग!

श्री दशभुजा गणेश, हेदवी

चला तर मग!

गोवळकोट उर्फ गोविंदगड, चिपळूण

चला तर मग!
Positive SSL