रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या निरनिराळ्या प्रसिध्द मंदिरांची निरनिराळी वैशिष्ट्ये आहेत. काही खूप प्राचीन, काही स्थानमाहात्म्यामुळे परिचित, तर काही स्थापत्यकलेसाठी प्रसिध्द. संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील सोमेश्वर मंदीर असेच खूप वेगळे ठरते ते मंदिरामध्ये एकावर एक असलेल्या दोन गर्भगृहांमुळे. या मंदिरामध्ये खालच्या गर्भगृहात शंकराची पिंडी आहे तर वरती श्री गणेशाची स्थापना केलेली दिसते.

तालुका - संगमेश्वर

बस स्थानक - संगमेश्वर

रेल्वे स्थानक - संगमेश्वर

योग्य काळ - वर्षभर 

मंदिराचा सभामंडप लाकडी असून सुंदर कमानी कोरलेल्या आहेत. मंदिरामधील खांबही लाकडी आणि सुंदर कोरलेले आहेत मात्र गाभाऱ्यातील खांब मात्र पाषाणात कोरलेले आहेत.  मंदिराचा परिसर अतिशय शांत, सुंदर आणि रमणीय आहे. 

मंदिराबाहेरील दीपमाळ अतिशय भव्य आणि अप्रतीम आहे.

मंदिरा शेजारी राजवाडीची प्रसिध्द गरम पाण्याची कुंड आहेत. या मधील पाणी विसण घातल्याशिवाय अंगावर घेतल्यास भाजेल एवढे कढत असते. इथून जवळच असलेल्या उक्षी गावात प्राचीन गूढ कातळशिल्पे पहायला मिळतात. पावसाळ्यात उक्षी येथील प्रसिध्द रानपाट चा धबधबा केवळ अप्रतीम दिसतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

कनकादित्य मंदिर, कशेळी

चला तर मग!

नितांत सुंदर जांभरूण

चला तर मग!

मांसाहारी

चला तर मग!
Positive SSL