श्री क्षेत्र पावस येथील ‘स्वामी स्वरूपानंद’ यांच्याबद्दल भक्तांच्या मनात अढळ श्रद्धा आहे. रत्नागिरीपासून १६ किमी अंतरावर असलेले पावस हे त्यांचे जन्मस्थान. भगवंताचे सच्चे उपासक असलेले स्वामी स्वरूपानंद, यांनी ब्रिटिशांविरुद्ध असहकार पुकारून स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता.

तालुका - रत्नागिरी 

बस स्थानक - रत्नागिरी

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - वर्षभर 

 येरवडा कारागृहात त्यांच्या देहाचे व मनाचे अमूलाग्र परिवर्तन होऊन त्यांची परमेश्वरावरची श्रद्धा दृढ झाली. तेथून लोक त्यांना ‘स्वामी स्वरूपानंद’ म्हणून संबोधू लागले. स्वामी १५ ऑगस्ट १९७४ रोजी समाधीस्त झाले. त्या जागेवर भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. स्वामीजींचे अलौकिक सेवाकार्य व शक्ती यांची प्रचिती आल्याने राज्यात व राज्याबाहेरही त्यांचा मोठा भक्तपरिवार आहे.

स्वामीजींच्या नित्य वापरातील वस्तू, त्यांची ग्रंथसंपदा येथे जतन केली आहे. दररोज दुपारी मंदिरात खिचडीचा महाप्रसाद असतो. मंदिर परिसरांत भक्तनिवासाची सोय आहे. या मंदिरात स्वामी स्वरूपानंदांचे चैतन्यरूपी वास्तव्य आहे अशी भक्तांची धारणा आहे. अतिशय शांत व पवित्र अशा या ठिकाणी मनाला प्रगाढ शांतीचा अनुभव येतो. 

अनुभवण्यासारखे खूप काही

श्री महागणपती मंदिर, गणपतीपुळे

चला तर मग!

दुर्गादेवी मंदिर

चला तर मग!

लाडघर समुद्रकिनारा

चला तर मग!
Positive SSL