अश्वत्थामा बलिर्व्यासो, हनुमानश्च बिभीषण | 
कृप: परशुराम, सप्तैते चिरंजीविन: |

या सात चिरंजिवींपैकी (ज्यांना मृत्यू नाही असे) परशुराम हे विष्णूंचा सहावा अवतार असून पश्चिम दिशेचे संरक्षणकर्ते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत. काश्यप ॠषींना पृथ्वी दान करून स्वतःसाठी समुद्राला मागे हटवून अपरांत भूमीची म्हणजेच कोकणाची निर्मिती करणाऱ्या श्री परशुरामांचे प्राचीन मंदिर चिपळूण जवळ १२ किमी अंतरावर आहे.

तालुका - चिपळूण

बस स्थानक - चिपळूण

रेल्वे स्थानक - चिपळूण

योग्य काळ - वर्षभर 

जमदग्नी ऋषी व माता रेणुका यांचे परशुराम हे पुत्र. अक्षय तृतीया हा त्यांचा जन्मदिन. या भार्गवरामाने परशु या शस्त्राने दुष्टांचे निर्दालन केले म्हणून ते परशुराम म्हणून ओळखले जाऊ लागले.

देवळाची प्रशस्त पाखाडी म्हणजे पायऱ्या जावळीचे चंद्रराव मोरे यांनी सुमारे ३०० वर्षांपूर्वी बांधल्या आहेत.

भव्य प्रांगणात असणारं त्यांचं साधसं देऊळ मन वेधून घेतं.

मंदिरातील गाभार्‍यात परशुरामांचा पलंग असून त्यावर श्रींच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत.

अनुभवण्यासारखे खूप काही

मामाचं गाव, तुरळ

चला तर मग!

खोरनिनको धबधबा, लांजा

चला तर मग!

कातळशिल्पं (खोदचित्रे)

चला तर मग!
Positive SSL