राजापूर तालुका जसा त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तसाच तेथे असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर मंदिरांसाठीसुद्धा ओळखला जातो. असेच एक शांत, प्रशस्त, पुरातन मंदीर म्हणजे नाटेश्वर. राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध नाटे गावाचे हे ग्राम दैवत. या मंदिरचा इतिहास सुमारे ७०० वर्षांचा असल्याचे सांगितले जाते.

तालुका - राजापूर

बस स्थानक - राजापूर

रेल्वे स्थानक - राजापूर

योग्य काळ - वर्षभर 

मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून विविध प्रकारच्या पक्ष्यांची इथे कायम गजबज असते. मंदीर परिसरातील खास कोकणी घरे, सुपारीच्या बागा आणि तिथली शांतता अनुभवावी अशीच आहे. देवळाबाहेरील दीपमाळा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. शंकराचे देऊळ असूनही सभामंडपात राम, सीता, लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती स्थापन केलेल्या दिसतात. शिवलिंग काळ्या पाषाणाचे असून गाभाऱ्यामध्ये खूप प्रसन्न वाटते. राजापूर रत्नागिरी रस्त्यावर जरा आडवाटेला असलेल्या नाटे गावास भेट दिल्यास नाटेश्वर मंदिरा बरोबरच नाटे बंदर, यशवंत गड, आंबोळगड गोडीवणे बीच, रानडे अॅग्रो टुरिझम अशा अनेक गोष्टी बघता येऊ शकतात.

अनुभवण्यासारखे खूप काही

सोयरी वनचरे

चला तर मग!

मत्स्यालय, रत्नागिरी

चला तर मग!

श्री क्षेत्र पावस, रत्नागिरी

चला तर मग!
Positive SSL