सह्याद्रि पर्वतराजीला भिडलेल्या संगमेश्वर तालुक्यात राकट सह्याद्रीची अनेक रूपं पाहायला मिळतात. आकाश भेदत गेलेले उत्तुंग कडे, सरळसोट उंच सुळके, घनदाट निबिड अरण्याने व्यापलेल्या दऱ्या, पावसाळ्यात धडकी भरवणारे प्रचंड जलप्रपात आणि अशा दुर्गम ठिकाणी वसलेला तो प्रलयंकारी मार्लेश्वर.....संपूर्ण कोकणात मार्लेश्वरसारखं दुसरं ठिकाण नाही.

तालुका - संगमेश्वर

बस स्थानक - देवरुख

रेल्वे स्थानक - संगमेश्वर

योग्य काळ - वर्षभर 

देवरूखपासून १८ कि.मी. अंतरावर एका निमुळत्या होत गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील उंच कपारीत मार्लेश्वर हे शंकराचं देवस्थान आहे. डोंगराच्या पायथ्यापर्यंत गाडी रस्ता असून मार्लेश्वर देवस्थानापर्यंत जाण्यासाठी सुमारे ५३० पायऱ्या चढाव्या लागतात.

मंदिरातील गुहेत समयांच्या व्यतिरिक्त इतर कोणताही दिवा लावण्यास परवानगी नाही. गुहेतील कपारींमधे `डुरक्या घोणस` या `बोआ` जातीच्या बिनविषारी सापांचे अस्तित्व आहे परंतु त्यांचा कोणालाही उपद्रव झाल्याचे ऐकिवात नाही. श्री शंकर हे दैवत अंगावर सर्प धारण करणारे म्हणून प्रसिध्द आहे. मार्लेश्वराच्या ठिकाणी आपल्याला याची प्रचिती येते.

मंदिराच्या समोरच जणू शंकराच्या जटेतून प्रवाहित झालेल्या गंगेसारखा शुभ्र असा धारेश्वर धबधबा कोसळत असतो. भर पावसाळ्यात मात्र या धबधब्याचं रूपं हे धडकी भरवणारं असतं. इथे येणाऱ्या श्रद्धाळूंसाठी व पर्यटकांसाठी हा धबधबा एक खास आकर्षण आहे. मकरसंक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते. सुमारे १ ते २ लाख भाविक दरवर्षी यात्रेला इथे येतात. रम्य परिसर, समोरचा कोसळणारा जलप्रपात, आसपासची वनराई आणि गूढ शांतता यांनी वेढलेला मार्लेश्वर मनात खूप काळ रेंगाळत राहातो.

अनुभवण्यासारखे खूप काही

गुहागर समुद्रकिनारा

चला तर मग!

मांसाहारी

चला तर मग!

सोमेश्वर मंदीर – राजवाडी

चला तर मग!
Positive SSL