मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पासून सुमारे १० कि. मी. अंतरावरील सावर्डे गावा पासून पश्चिमेकडे वळावे.  निसर्गरम्य परिसरातून काही कि.मी. अंतर पार केल्यावर सहज  इखाद्या चहाच्या हॉटेल वर ‘इथे अजून पाहण्यासारखे काय आहे’ असे विचारावे; उत्तर मिळेल ‘आमचो शिरंब्याचो मल्लिकार्जुन मंदीर’.

तालुका - चिपळूण

बस स्थानक - सावर्डे

रेल्वे स्थानक - चिपळूण

योग्य काळ - वर्षभर 

सावर्डे गावापासून सुमारे ४० कि. मी. आत असणाऱ्या शिरंबे गावाच्या  मल्लिकार्जुन मंदिराची सर्वत्र ख्याती पसरण्याचे कारण सुद्धा तसेच आहे. डोंगरातील झऱ्याचे अतिशय सुयोग्य नियोजन करून पाणी एका मोठ्या कुंडात फिरवले आहे आणि त्याच्या मधोमध मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. हे मंदीर म्हणजे स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे. पावसाळ्यात अथवा हिवाळ्याच्या सुरुवातीस गेल्यास मंदीर आणि त्या भोवतालचा हिरवा कंच परिसर अक्षरश: वेड लावतो. हे मंदीर प्राचीन नसले तरी त्याची बांधणी रेखीव आहे. मंदिरा भोवती असलेल्या या कुंडामध्ये १२ महिने पाणी असते. इथून जवळच असलेले वीर देवपाट आणि धामापूर हे धबधबे  पाहण्यासारखे आहेत.

अनुभवण्यासारखे खूप काही

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, रत्नागिरी

चला तर मग!

रत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी

चला तर मग!

पूर्णगड, रत्नागिरी

चला तर मग!
Positive SSL