कोकणातील निसर्गरम्य परिसरात वसलेली मंदिरे अगदी वैशिष्ट्यपूर्ण असतात. सुबक, टुमदार, कौलारू छतांची असलेली ही मंदिरे भाविकांचे कितीतरी पिढ्यांपासून श्रद्धास्थान बनून राहिली आहेत. कोकणातल्या डोंगरांवर, तळ्याकाठी, नदीकाठी, हिरव्यागर्द रानांमध्ये या मंदिराचे शतकानुशतके वास्तव्य आहे. उटंबर डोंगराच्या पायथ्याशी गर्द वनराईच्या पार्श्वभूमीवर केळशी गावच्या दक्षिण टोकाला असंच एक महालक्ष्मीचं मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम पेशवाईच्या काळातील आहे.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - वर्षभर 

मंदिर परिसरात तळे असून तळ्यात उतरण्यासाठी पायर्‍याही आहेत. तळ्यात नेहमी अनेक कमळं फुललेली असतात. हिरव्यागार वनराईच्या पार्श्र्वभूमीवर मंदिराचा परिसर उठून दिसतो.

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी खास सनई चौघडा वादनासाठी नगारखाना बांधला असून मंदिराच्या संपूर्ण परिसराला ८ ते १० फूट उंचीची दगडी तटबंदीसुध्दा आहे. देवालयाला दोन घुमट असून एका घुमटाखाली महालक्ष्मीचे स्वयंभू स्थान असून दुसऱ्या घुमटाखाली सभागृह आहे. संध्याकाळच्या वेळी सनईचे सूर कानी पडल्यावर मंदिरात पाय आपोआपच रेंगाळतात. 

येथे चैत्र शुध्द अष्टमी ते चैत्र शुध्द पौर्णिमा या काळात देवीचा मोठा उत्सव असतो, जो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. नवरात्री हा तर देवीचाच उत्सव असल्याने त्यां काळातही मंदिरात खूप प्रसन्न वातावरण असते. मंदिराला सुंदर दिव्यांची रोषणाई केलेली असते व देवळात गोंधळ, कीर्तन, रथयात्रा असे कार्यक्रम असतात.

अनुभवण्यासारखे खूप काही

शिवसृष्टी, डेरवण

चला तर मग!

खेडची लेणी

चला तर मग!

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

चला तर मग!
Positive SSL