कशेळीच्या कनकादित्य मंदिरापासून तीन किमी अंतरावर आडिवरे गावी महाकालीचे जागृत देवस्थान आहे. श्री योगेश्वरी, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली, श्री महासरस्वती आणि श्री रवळनाथ अशा पांच देवतांची मंदिरे इथे आहेत.

तालुका - राजापूर

बस स्थानक - राजापूर

रेल्वे स्थानक - राजापूर रस्ता

योग्य काळ - वर्षभर 

श्री महाकालीची चतुर्भुज मूर्ती काळ्या दगडातील असून ती दक्षिणमुखी आहे. गळ्यात माळा, मस्तकावर पंचमुखी टोप, हातात डमरू, त्रिशूळ, तलवार व पंचपात्र आहे. देवीचे पौर्णिमा व अमावस्येला नारळाचे दूध व तेल याने मर्दन करून स्नान घाल्याण्याची प्रथा पाळली जाते. देवीला भक्तांनी १२ किलो चांदी वापरून तयार केलेली `मयूरशिबिका` ही पालखी पाहण्यासारखी आहे. नवरात्रांत येथे मोठा उत्सव असतो.

इ.सं. १११३ मध्ये शिलाहार राजवंशातील भोज राजाने दिलेल्या एका दानपत्रात आडिवरे या गावाचा उल्लेख `अट्टविरे` या नावाने आढळतो. याचा अर्थ हे गाव त्यापूर्वी पासून अस्तित्वात आहे. आडिवरे येथे शके १२५० म्हणजे इ.सं. १३२४ मध्ये हे महापीठ अस्तित्वात आले. आद्य शंकराचार्यांनी याची स्थापना केली असे मानतात.

अनुभवण्यासारखे खूप काही

मत्स्यालय, रत्नागिरी

चला तर मग!

सुपारी (पोफळी)

चला तर मग!

पंखांवरचे भरारते जग

चला तर मग!
Positive SSL