शांत, पवित्र, रमणीय या शब्दांचा खराखुरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर रत्नागिरी तालुक्यातील कोळिसरे येथील श्री लक्ष्मीकेशव मंदिरच डोळ्यांसमोर येते. जयगडवरून चाफे फाट्याकडे येताना डावीकडून कोळिसरे गावात जाता येते. रत्नागिरीपासून कोळिसरे ४६ किमी अंतरावर आहे. मंदिर व त्याचा परिसर हा इतक्या दाट झाडीने व्यापलेला आहे, की या झाडीत गाव आहे का? असा प्रश्न पाहणाऱ्याला पडतो.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - गणपतीपुळे

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - वर्षभर 

कोकण परिसर हा अनेक कलाविष्कारांसाठी प्रसिध्द आहे. शिल्पकला ही त्यातील अशीच एक अनोखी कला आहे जिचा आविष्कार मंदिरातील मूर्त्यांमधून प्रकट होत असतो. श्री लक्ष्मीकेशवाची सावळी मूर्ती अतिप्राचीन आहे.

सुमारे पाच फूट उंचीची ही मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीतील काळसर तांबूस शाळीग्रामामधून घडवलेली असून, ती शिल्पकलेचा एक सुंदर आविष्कार आहे. मूर्तीवरील कोरीवकाम अतीव सुंदर असून प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. ही प्रसन्नवदन मूर्ती पाहताच मन मोहवून टाकते. महाराष्ट्रातील अतिशय अप्रतिम मूर्तींमध्ये या मूर्तीचा समावेश आहे.

लक्ष्मीकेशवाच्या मंदिराखालून बारमाही वाहणाऱ्या झऱ्याला `तीर्थ` असं संबोधलं जातं. `आप` म्हणजे पाणी, हा पंच महाभूतांमधील एक महत्त्वाचा व सजीवांच्या दृष्टीने जीवनावश्यक घटक आहे. या घटकाचे महत्त्व ओळखून त्या स्त्रोताचे संरक्षण व्हावे या दूरदृष्टीतून अशा ठिकाणी मंदिरांची स्थापना झालेली दिसते.

देवळाजवळ पोहोचल्यावर मोकळ्या जागेतून खाली उतरणारी दगडी पाखाडी (पायऱ्या) दिसतात. अमाप निसर्गसौंदर्य, शहरी कोलाहलापासून दूर, देवळाजवळील वाहणारा इथला झरा, गर्द झाडी, मन एकाग्र करणारी शांतता...  सारं कसं वेगळं वाटणारं... मंदिराच्या परिसरातील निसर्गसान्निध्यांत आपल्याला त्या सर्वव्यापी शक्तीचे अस्तित्व निश्चितच जाणवत राहाते.

अनुभवण्यासारखे खूप काही

पंखांवरचे भरारते जग

चला तर मग!

सोयरी वनचरे

चला तर मग!

श्री क्षेत्र परशुराम, चिपळूण

चला तर मग!
Positive SSL