निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभणे याची प्रचिती देणारं एक नितांत सुंदर ठिकाण म्हणजे केशवराज मंदिर. दापोलीपासून दापोली-हर्णे रस्त्यावर सुमारे ६ किमी अंतरावर आसूदबाग आहे. हा परिसर अतिशय सुंदर आणि अक्षरशः वेड लावणारा आहे. 

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - वर्षभर 

दाबकेवाडयापासून खालच्या बाजूला एक पायवाट जाते. वाटेवर दोनीही बाजूला नारळी पोफाळीची दाट बनं आहेत, जी या वाडीत शेकडो वर्षे अस्तित्वात आहेत. मंदिर पेशवेकालीन बांधणीचे असून समईच्या मंद प्रकाशात उभी असलेली श्री विष्णूची सुंदर सावळी मूर्ती मन वेधून घेते. मंदिर दक्षिणाभिमुख असून परिसरातील प्रसन्न वातावरण मनाला भारून टाकतं. मंदिराच्या डाव्या हाताला गणेशमूर्ती असून मंदिराला चारही बाजूंनी दगडी फरसबंदी आहे. 

हे मंदिर केशवराज देवराई म्हणूनही प्रसिध्द आहे. चारही बाजूने दाट झाडी असलेला केशवराजचा मंदिर परिसर जरा गूढरम्य भासतो. कोकणात फार कमी ठिकाणी आढळणारा बारमाही ओढा केशवराजच्या याच घनदाट वनराईतून वाहतो. मंदिराकडे जाताना ओढ्यावरील पूल पार केल्यावर पायऱ्या लागतात. रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या काही उत्कृष्ट देवरायांमधे केशवराजचा समावेश होतो. 

आजूबाजूच्या जंगलातील रानफुलं व समृद्ध जंगलाचे प्रतीक असलेल्या बुराशींचे विविध प्रकार वाटेवर आढळून येतात. 

केशवराज देवराईचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वरच्या डोंगरातून उगम पावलेल्या झऱ्याचं पाणी दगडी पन्हाळीतून खालवर आणलं गेलं आहे.

श्री केशवराजच्या प्रांगणात असलेल्या दगडी गोमुखातून येणारे पाणी १२ महिने वाहतं असून ते थंड आणि चवदार असतं.

या रम्य वातावरणातील भटकंती मन प्रसन्न करून जाते. केशवराज परिसरातील एकांत, निरव शांतता आणि निसर्गसान्निध्यात परमेश्वराच्या अस्तित्वाची खरीखुरी जाणीव होते.

अनुभवण्यासारखे खूप काही

शिवसृष्टी, डेरवण

चला तर मग!

श्री क्षेत्र पावस, रत्नागिरी

चला तर मग!

याकूतबाबा दर्गा, केळशी

चला तर मग!
Positive SSL