संगमेश्वर क्षेत्राचा इतिहास फार प्राचीन आहे. सह्याद्रीच्या कुशीत गच्च हिरव्यागार वनांनी वेढलेला संगमेश्वराचा परिसर अनेक राज्यकर्त्यांना भुरळ घालत आला आहे. सुमारे एक हजार ज्ञात इतिहासानुसार शिलाहार  राजघराण्याच्या कालापासून या कसबा संगमेश्वराचे महत्व अधोरेखित होत आहे.

तालुका - संगमेश्वर

बस स्थानक - संगमेश्वर

रेल्वे स्थानक - संगमेश्वर

योग्य काळ - वर्षभर 

अकराव्या शतकात येथे अतिशय अप्रतिम अशा कर्णेश्वर मंदिराची उभारणी केली गेली. तर इ.स.११०८ च्या काळात, ११ व्या शतकात कसबा संगमेश्वर येथे अनेक भाविकांनी ३०६ मंदिरांचा समूह उभारला अशी इतिहासात नोंद आहे. याचाच अर्थ त्याकाळात या परिसरात भागात सुबत्ता नांदत होती कारण कोणताही अत्त्युत्तम कलाविष्कार तेव्हाच प्रकट होत होतो जेव्हा तो फुलण्यासाठी सर्वत्र अनुकूलता असते. 

प्राचीन शिल्पकलेचा अतिशय अप्रतिम नमुना असलेली ही मंदिरे हा एक अनमोल ठेवा आहे. आज इतक्या वर्षानंतर मात्र त्यातील मोजकीच मंदिरे पहायला मिळतात. कदाचित त्यांचे गर्द रानात अस्तित्व असल्याने ती आजतागायत टिकून राहिली असावीत. मंदिरांची रचना अतिशय सुंदर असून त्यांवर सुबक मूर्ती कोरलेल्या आढळतात. आज इतक्या वर्षांनंतरही संगमेश्वर क्षेत्री उभा असलेला हा मंदिर समूह बघणाऱ्याचे भान हरपून टाकतो.

जवळील प्रेक्षणीय ठिकाणे -     कर्णेश्वर मंदीर, गरम पाण्याची कुंडे - राजवाडी ,  गरम पाण्याची कुंडे - तुरळ, मामाचे गाव - तुरळ, कातळशिल्पे - उक्षी  

 

अनुभवण्यासारखे खूप काही

प्रसिद्ध व्यक्ती

चला तर मग!

निवळीचा धबधबा, रत्नागिरी

चला तर मग!

श्री क्षेत्र पावस, रत्नागिरी

चला तर मग!
Positive SSL