संगमेश्वर येथे अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांचा संगम होतो. या नद्यांच्या संगमस्थळी कर्णेश्वर हे प्राचीन हेमाडपंती मंदिर शतकानुशतकं उभं आहे. अंदाजे सोळाशे वर्षांपूर्वी करवीरच्या राजघराण्यातील `राजा कर्ण` याने इथे या भव्य मंदिराची उभारणी केली असं सांगितलं जातं. कोकणातील एक अतिशय देखणं मंदिर म्हणून कर्णेश्वर मंदिराचा उल्लेख करता येईल.

तालुका - संगमेश्वर

बस स्थानक - संगमेश्वर

रेल्वे स्थानक - संगमेश्वर

योग्य काळ - वर्षभर 

हे पूर्वाभिमुख मंदिर २६ मीटर लांब व २३ मीटर रुंद आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर प्रचंड मोठा सभामंडप व त्यापुढील गाभारा असून त्यात श्री कर्णेश्वराची पिंड व पार्वतीची मूर्ती आहे. हे संपूर्ण मंदिर दीड मीटर उंचीच्या चौथऱ्यावर उभारलं आहे. मंदिराला सोळा कोन व पाच घुमटांचे शिखर आहे. पाचव्या घुमटाचं टोक तळापासून २५ मीटर उंचीवर आहे. या पाच घुमटांशिवाय इतरही ३३ छोटे घुमट इथे आहे.

हे मंदिर ज्यांनी उभं केलं त्यां शिल्पकारांच्या कलाविष्काराचं कौतुक करावं तेवढ थोडंच आहे. संगमेश्वरमधील या मंदिराचा परिसर अत्यंत शांत व रमणीय आहे. मंदिरावर अप्रतिम शिल्पसौंदर्य कोरलेले आहे.

महाद्वार, मुख्य मंडप, नंदीमंडप आणि भिंतींवर कोरलेल्या अष्टभैरव, द्वारपाल, शंकर, देव-दानव, यक्ष, किन्नर, नृत्यांगना यांच्या प्राचीन प्रतिमा या गतकालीन शिल्पवैभव आपल्यासमोर उभे करतात. कसबा संगमेश्वर या नावने हा परिसर ओळखला जातो व येथील विविध हेमाडपंती  देवळांमधे अतिशय सुंदर शिल्पं पाहता येतात. 

जवळील प्रेक्षणीय स्थळे - प्राचीन मंदिरे समूह, सोमेश्वर मंदीर - राजवाडी,  गरम पाण्याची कुंडे, गरम पाण्याची कुंडे - तुरळ, मामाचे गाव - तुरळ  

अनुभवण्यासारखे खूप काही

गणपतीपुळे समुद्रकिनारा

चला तर मग!

पूर्णगड, रत्नागिरी

चला तर मग!

गुहागर समुद्रकिनारा

चला तर मग!
Positive SSL