पावसपासून 18 किलोमीटर अंतरावर कशेळी गावात कनकादित्याचे प्राचीन मंदिर आहे. येथिल सूर्यनारायणाची मूर्ती ८०० वर्षांपूर्विची आहे. हे मंदिर पूरातन असल्याचा पुरावा मंदिरातील ताम्रपटावरून मिळतो. मंदिरात प्रवेश करताच परिसरातील शांत आणि प्रसन्न वातावरण जाणवू लागते. पूर्वेकडून प्रवेश केल्यावर प्रशस्त असा सभामंडप दिसतो.

तालुका - गुहागर

बस स्थानक - गुहागर

रेल्वे स्थानक - चिपळूण

योग्य काळ - वर्षभर 

मंदिरात कमालीची स्वच्छता असून तिथे निरव शांतता असते. आदित्य म्हणजे सूर्य. भारतात फारच थोडी सूर्य मंदिरे आहेत. मंदिरात प्रवेश करताच जांभ्या दगडात सजलेला परिसर आणि परिसरातील इतर देवदेवतांच्या सुंदर कोरलेल्या मूर्ती दिसू लागतात. लाकडी खांबावर वेलबुट्टी, नक्षी, विविध देवतांच्या लाकडावर कोरलेल्या प्रतिमा आहेत. या मध्ये षडानन, वरूण, श्रीकृष्ण, वायू, मेंढ्यावर स्वार झालेला अग्निनारायण आदी देवता आहेत तर समुद्रमंथनासारखे प्रसंगही कोरलेले आहेत.

गाभाऱ्याच्या द्वारावर शेषशायी विष्णूची भव्य लाकडी प्रतिमा असून शेजारी गरुड व लक्ष्मी आहेत. वरती दशावतार आहेत. मंदिरात खुद्द कनकादित्याची काळ्या पाषाणातील अप्रतिम मूर्ती असून त्याच्या साठी खास चांदीचा रथ आहे.

कनकादित्य मंदिरात सुमारे ८५० वर्षांपूर्वीचा ताम्रपट आहे. तांब्याचे जाड पत्रे एका काडीत ओवले असून तो ताम्रपट बघण्यासारखा आहे. या दानपत्राचा कालावधी शके १११३ म्हणजे इ.सं. ११९१ मधील आहे. 

जवळील प्रेक्षणीय स्थळे - महाकाली मंदीर, गोडवणे बीच, आर्यादुर्गा मंदीर व कातळशिल्पे, मुसाकाजी बंदर, यशवंत गड, आंबोळगड    

अनुभवण्यासारखे खूप काही

शारदादेवी मंदिर, तुंबरव

चला तर मग!

विंध्यवासिनी मंदिर, चिपळूण

चला तर मग!

बाणकोट किल्ला, मंडणगड

चला तर मग!
Positive SSL