पश्चिमेचा अथांग सागर, गर्द माडांच्या गर्दीत हरवून गेलेलं आंजर्ले गाव, दूरवर दिसणारा जोग खाडीचा परिसर, डोंगरावरून खाली उतरणारा नागमोडी रस्ता, गावातून मंदिरापर्यंत वर चढत आलेली पायऱ्यांची वाट आणि गच्च झाडीने वेढलेला मंदिराचा परिसर....वर्णन करावं तेवढ थोडंच! सकल कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणेशाची स्थापना अशा सुयोग्य ठिकाणी करण्याची कल्पना ज्यांना सुचली त्यांच्या कलात्मकतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - वर्षभर

आंजर्ले गाव हे दापोलीहून केळशीकडे जाताना साधारण १८ किमी अंतरावर लागतं. गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे टेकडीवर असलेलं हे श्रीगणेशाचे जागृत देवस्थान `कड्यावरचा गणपती’ म्हणून प्रसिध्द आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिराकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो व टेकडीवरील मंदिरापर्यंत वाहनांसाठी थेट रस्ता आहे. मंदिराची स्थापना सहाशे वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १४३० च्या सुमारास केली असावी असे मानण्यात येते.

मंदिरातील श्री गणेशाची सुबक मूर्ती साडेतीन ते चार फुटांची असून मूर्तीच्या बाजूला कोरलेल्या प्रतिमा या ॠध्दि-सिद्धीच्या आहेत.

या मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते व मंदिराचा इ.स. १७८० मध्ये जीर्णोध्दार करण्यात आल्यानंतर सध्याचे मंदिर उभे राहिले आहे. हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. मंदिराच्या आसपासचा परिसर देखणा आहे ! 

जवळची प्रेक्षणीय स्थळे - आंजर्ले बीच, केळशी बीच, वेळास बीच, बाणकोट किल्ला, मुरुड बीच, सुवर्ण दुर्ग, केशवराज मंदीर, हर्णे बंदर, कर्दे बीच  

अनुभवण्यासारखे खूप काही

राजापूरची गंगा

चला तर मग!

शाकाहारी

चला तर मग!

वॅक्स म्युझियम, गणपतीपुळे

चला तर मग!
Positive SSL