अखिल महाराष्ट्राचे श्रध्दास्थान म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते ते श्री क्षेत्र गणपतीपुळे हे रत्नागिरीतील अग्रणी स्थानांपैकी एक आहे. रत्नागिरीहून ३५ कि.मी. अंतरावर समुद्राकाठी हे लोभस ठिकाण वसलेले आहे. निवळी फाट्यावरून गणपतीपुळ्यापर्यंतचा प्रवास नजरेला सुखावणारा आहे. 

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - गणपतीपुळे

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - वर्षभर 

रक्षणकर्त्या श्री महागणपतीसमोर अथांग पसरलेला चंदेरी सागर जणू त्याला पदस्पर्श करून शांत होत असतो. गर्द हिरवाईने नटलेल्या डोंगरपरिसरतून मंदिराला मारलेली प्रदक्षिणा भाविकांना मन:शांती देऊन जाते. इथल्या गणेशमंदिराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. चंदेरी सागराच्या पार्श्वभूमीवर गणेशाचे शुभ्र धवल मंदिर खूप उठून दिसते. अनेकांच्या मनोकामना पूर्ण करणारा, भक्तांच्या नवसाला पावणारा हा श्री चिंतामणी आहे अशी भाविकांची या गणेशाबद्दल श्रद्धा आहे.

पेशवेकाळात श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी मंदिरासमोरचा नंदादीप उभारला तर श्रीमंत बाजीराव यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी येथे नगारखान्याची व्यवस्था केली. तर श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई यांनी येथे दगडी धर्मशाळा उभारली असे उल्लेख इतिहासात आढळून येतात.

अंगारकी, संकष्टी आणि माघ महिन्यातील चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते. परिसरातील उद्यान आणि मंदिर परिसराच्या सुशोभीकरणामुळे हे देवस्थान भाविक आणि पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण बनले आहे. या परिसरात अनेक चांगली हॉटेल्स असून घरगुती निवास व्यवस्था मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

गरम पाण्याची कुंड, तुरळ

चला तर मग!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

चला तर मग!

बाणकोट किल्ला, मंडणगड

चला तर मग!
Positive SSL