रत्नागिरीहून फक्त २२ कि. मी. अंतरावर व पावसपासून पूर्णगडकडे जाताना पुढे उजव्या हातास एक फाटा फुटतो. तिथून पुढे ४ कि. मी. वर गणेशगुळ्याचे हे प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिर सुमारे ४०० वर्षे जुने असून मंदिर बांधणी जांभ्या दगडातील आहे. सध्या त्यावर पांढऱ्या रंगाची रंगरंगोटी केलेली आहे.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - रत्नागिरी

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - वर्षभर 

डोंगरउताराच्या बाजूने बघताना मंदिर सुमारे ४० फूट उंचीवर उभे असल्याचे दिसते. हे मंदिर शिवपूर्वकालीन असावे कारण इथल्या मंदिराची घुमटी वेगळ्याच प्रकारची आहे. घुमटीच्या प्रवेशद्वारावर एका मोठ्या दगडाची शिळा असून त्यामुळे प्रवेशद्वार बंद झाले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात नेहमीप्रमाणे प्रचलित अशी गणेशमूर्ती नसून याच स्वयंभू शिळेला श्री गणेश मानून त्याची पूजा केली जाते.

या मंदिर परिसरात आवर्जून बघण्यासारखं एक मानवनिर्मित आश्चर्य आहे. मंदिराजवळच सत्तर फूट लांबीची एक विहीर दगडांत खोदली असून ती बघण्यासारखी आहे. फार पूर्वी केव्हातरी ही विहीर इथल्या सड्यावर का बांधली? तिचे पाणी किती खोलीवर लागले? त्याकाळी ही विहीर खणताना काय काय अडचणी आल्या? हे सर्व प्रश्न आजतरी अनुत्तरीत आहे. विहीर मात्र बघण्यासारखी असून हे मानवनिर्मित आश्चर्य बघून स्तिमित व्हायला होते.

पूर्वीच्या काळी या गणपतीच्या नाभीतून म्हणजेच या शिळेतून पाण्याची संततधार वाहात असे आणि ते तीर्थ एका गोमुखातून बाहेरच्या बाजूस पडत असे. एके दिवशी ते पाणी येणे अचानक बंद झाले. अर्थात त्याला काही तरी नैसर्गिक कारण असावे परंतु तेव्हापासून श्रध्दाळूंच्या मनात मात्र देवाने गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला प्रस्थान केले अशी श्रध्दा बसली. गणेशगुळ्याच्या  गणपतीला `गलबतवाल्यांचा गणपती` म्हणूनही ओळखतात. मंदिर परिसर अतिशय शांत असून मंदिराच्या आवारात उभे राहिल्यास समोर सुंदर वनश्री दिसते.

अनुभवण्यासारखे खूप काही

लाडघर समुद्रकिनारा

चला तर मग!

खोरनिनको धबधबा, लांजा

चला तर मग!

निसर्ग संपन्न भू

चला तर मग!
Positive SSL