राजापूरवर निसर्गाने आपल्या खजिन्याची मुक्तपणे उधळण केली आहे. राजापूर बसस्थानकापासून अगदी जवळ, ३ ते ४ किमी अंतरावर, घनदाट वनराजीमध्ये मृडानी नदीच्या असंख्य लहानमोठ्या धबधब्यांमध्ये वसलंय धूतपापेश्वराचं मंदिर. 

तालुका - राजापूर

बस स्थानक - राजापूर

रेल्वे स्थानक - राजापूर रस्ता

योग्य काळ - वर्षभर

मंदिराचा सर्व परिसर केवळ अवर्णनीय आहे. प्रदूषणाचा लवलेशही नसलेल्या गर्द वनश्रीतून मंदिराकडे जाणारी वाट, डोंगरामधून खळाळत वाहणारं मृडानी नदीचं पात्र, शेकडो वर्षे जुने असे वृक्ष पुरुषोत्तम, शंकराच्या जटा धारण केल्यासारख्या त्या वटवृक्षांच्या पारंब्या आणि या सर्वांना व्यापून राहिलेली शांतता अशा पावित्र्याने भारलेल्या वातावरणात आपण आपसूकच धूतपापेश्वरच्या चरणी लीन होतो.

मंदिराची सभागृह, मंडप, गर्भगृह अशी रचना असून मंदिरात येताक्षणी मन प्रसन्न होते. हे देवस्थान एक हजार वर्षे पुरातन असल्याचं मानलं जातं. 

मंदिरातील शंकराच्या मोठ्या पिंडीवर मंदिराच्या आवारात मिळणाऱ्या सुंदर फुलांची आरास केलेली असते. येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. त्याचप्रमाणे दर श्रावणी सोमवारी व विजयादशमीला इथे खूप गर्दी असते.

अनुभवण्यासारखे खूप काही

बंदरे

चला तर मग!

पंखांवरचे भरारते जग

चला तर मग!

प्रसिद्ध व्यक्ती

चला तर मग!
Positive SSL