दाभोळच्या खाडीपासून ५ किमी अंतरावर व दापोलीपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेले श्री चंडिकादेवीचे मंदिर खूप वैशिष्ट्यपूर्ण व जागृत देवस्थान आहे. डोंगरातील एका नैसर्गिक गुहेत एकसंध पाषाणांत देवीची मूर्ती व गाभारा उभारण्यत आला आहे. गाभाऱ्यात विजेचा वापर केला जात नाही. समयांच्या मंद प्रकाशात उजळलेलं देवीचं रूप डोळ्यात साठवून घ्यावं असच असतं.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - वर्षभर 

गुहेची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. देवीच्या दर्शनासाठी आत प्रवेश करताना नम्रतेनेच जावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराला भेट दिल्याचे सांगितले जाते.

इतर मंदिरांपेक्षा गूढरम्य भासणारे हे दाभोळचे प्राचीन चंडिकादेवीचे मंदिर एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. 

अनुभवण्यासारखे खूप काही

अंजनवेल, गुहागर

चला तर मग!

मंडणगड किल्ला, मंडणगड

चला तर मग!
Positive SSL