राजापुरातील आडिवरे गावाजवळ उत्तरेला ११ कि.मी. अंतरावर वसलेलं पांडवकालीन मंदिर म्हणजे आर्यादुर्गा देवीचे मंदिर. आडिवरे येथून दोन किलोमीटर अंतरावर धारतळे फाट्यापासून सहा किलोमीटर अंतरावर हे मंदिर उभं आहे.

तालुका - राजापूर

बस स्थानक - राजापूर

रेल्वे स्थानक - राजापूर

योग्य काळ - वर्षभर 

कर्नाटकातील अंकोला येथील आर्यादुर्गा देवी ही देवीहसोळ गावाच्या देसाई यांच्या प्रर्थानेनुसार या स्थानावर आली अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जाकादेवीचे मंदिर असून पावसपासून आर्यादेवीचे मंदिर सुमारे ३९ कि.मी. अंतरावर आहे. मंदिराच्या जवळ कातळावर कातळ खोद चित्रे आढळतात.

मंदिरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर कातालामध्ये खणलेली एक अप्रतीम पायऱ्याची विहीर आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णाष्टमी आणि नवमीला येथे दीड दिवसांची जत्रा भरते. इथली शांतता अनुभवावी अशीच आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

जल क्रीडा

चला तर मग!

खोरनिनको धबधबा, लांजा

चला तर मग!

महाकाली मंदिर, आडिवरे

चला तर मग!
Positive SSL