अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्यांच्या संगमावर संगमेश्वर हे स्थान उभं आहे. या जागी भगवान परशुरामांनी तप केले असे मानले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्धी असलेलं हे ठिकाण सह्याद्रीला अगदी खेटून उभं आहे.शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारे दुर्गम किल्ले, प्राचीन मंदिरे, गरम पाण्याचे झरे हे सर्वकाही इथे आहे. इथले वळणावळणाचे रस्ते, घनदाट झाडी, पावसाळ्यात उंचावरून कोसळणारे पांढरेशुभ्र जलप्रपात असं सर्व काही अनुभवायलाच हवं. देवरूखजवळचे टीकलेश्वर हे ठिकाण तर सह्याद्रीच्या अगदी ऐन माथ्यावर, खूप उंचीवर वसले आहे. इथून दिसणारा घाट परिसर व खोल दऱ्या बघून अवाढव्य सह्याद्रीचा प्रचंड विस्तार ध्यानात येतो.

Positive SSL