अर्जुना नदी जिथे समुद्राला मिळते तिथल्या खाडीमुखावर वसलेलं राजापूर बंदर समुद्रापासून १५ मैल आत असल्याने त्याकाळी सर्वांत सुरक्षित बंदर मानले जाई. रत्नागिरी शहरापासून राजापूर ३० मैलांवर आहे. येथे पूर्वी इंग्रजांची वखार होती. राजापूरच्या आसमंतावर निसर्गाने विशेष प्रेमाने आपल्या खजिन्याची उधळण केली आहे. इथली वनश्री, राईत लपलेली छोटी घरं, धूतपापेश्वर व त्याजवळचा सुंदर धबधबा, राजापूरची प्रसिध्द गंगा, उन्हाळेजवळचे गरम पाण्याचे झरे असं कितीतरी इथे पाहाण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे राजापूर येथे आढळणाऱ्या अतीप्राचीन कातळशिल्पांसाठी सध्या प्रकाशझोतांत येत आहे.

Positive SSL