रत्नागिरीच्या उत्तरेकडे वसलेला मंडणगड तालुका हा दरवर्षी वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर भरणाऱ्या `कासव महोत्सवामुळे` सर्वत्र प्रसिध्द आहे. मंडणगडचा बाणकोटचा किल्ला हे रत्नागिरी जिल्ह्याचं उत्तरेकडचं टोक मानलं जातं. रायगड जिल्हातील श्री क्षेत्र हरिहरेश्वरला भेट दिल्यावर केवळ ४ कि.मी. वर असलेल्या बागमांडला या गावालगत असलेल्या बाणकोट खाडीतून फेरीबोटीने अगदी स्वतःच्या वाहनासह काही मिनिटांतच मंडणगडच्या वेसवी गावात पोहोचता येते. मंडणगड तालुक्याची भटकंती करताना वेळासचा कासव महोत्सव, मंडणगड किल्ला, बाणकोट किल्ला, आंबडवे येथील आंबेडकर स्मारक या गोष्टी चुकवून चालत नाही.

बाणकोट किल्ला, मंडणगड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

मंडणगड किल्ला, मंडणगड

वेळासचा समुद्रकिनारा

Positive SSL