खेड हा रत्नागिरीतील सह्याद्रीच्या अगदी कुशीत वसलेला तालुका आहे. इथल्या जगबुडी नदीमध्ये गोड्या पाण्यातील मगरींचे अस्तित्व आहे. रसाळगड, महिपतगड, सुमारगड, पालगड, महिमंडणगड अशा डोंगरीकिल्ल्यांची इथे माळचं आहे. पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई फुलल्यावर गिरीभ्रमण करणाऱ्यांसाठी सह्याद्रीतील दुर्गम व अवघड वाटांवरची ही भटकंती जेवढी आव्हानात्मक तेवढीच आनंददायी ठरते.

खेडची लेणी

रसाळगड, खेड

Positive SSL