समुद्रसपाटीपासून ७०० ते ८०० फूट उंचीवर दापोली हे टुमदार गाव वसलं आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर, निवांत वेळ घालवण्यासाठी पर्यटक वारंवार इथे येत असतात. थंड हवेमुळे याला `कोकणाचे महाबळेश्वर’ असेही म्हणतात. समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने येणारे सीगल पक्षी, अधूनमधून दर्शन देणारे डॉल्फिन्स हे सगळचं खूप सुंदर आहे. दापोली परिसरात अनेक फळबागा आहेत ज्यांचा वापर करून दापोलीत कृषी पर्यटनकेंद्रं विकसित केली आहेत. हर्णे किनाऱ्यावर भरणारा मासळीबाजार, माशांचा लिलाव, ऐतिहासिक गड किल्ले, बंदरं आणि वास्तूंसाठी दापोली प्रसिध्द आहे. महर्षी कर्वे, रँगलर परांजपे अशी थोर व्यक्तिमत्त्वं इथे जन्मली आहेत.

Positive SSL