निसर्गसंपन्न चिपळूण हे अनेक घाटांनी वेढलेलं आहे. चिपळूण व आसपासचा परिसर हे विविध जातींचे पक्षी विपुलतेनं बघण्याचं ठिकाण आहे. वसिष्ठी, जगबुडी या नद्यांमध्ये मोठमोठ्या मगरींचे वास्तव्य आहे. इथल्या नद्यांच्या खाड्या या निसर्ग संपत्तीने व खारफुटीच्या वनांनी समृद्ध आहेत. ऐन पावसाळ्यात वीर देवपाट व चिपळूणजवळचा सवतसडा हे धबधबे अतिशय सुंदर दिसतात… अगदी चुकवू नयेत असे! इथे असलेली `डेरवणची शिवसृष्टी` ही सावर्डे गावापासून फक्त २ कि.मी. वर आहे. चिपळूणचे परशुराम मंदिर व विंध्यवासिनी ही तर कोकणभूमीची आराध्यदैवतं! त्यांच्या दर्शनाशिवाय कोकण सफर पूर्ण कशी होणार? जवळच्या वशिष्ठीच्या खाडीमुखावर वसलेल्या गोवळकोट किल्ल्याचा परिसर अतिशय सुंदर असून आवर्जून पाहावा असाच आहे.

Positive SSL