असे वाचल्यावर हे ‘भू’ काय आहे हा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. संपूर्ण भारतातील एकाक्षरी नाव असलेले हे बहुदा एकमेव गाव असावे. राजापूर आणि लांजा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या गावावर निसर्गदेवतेची खास मर्जी आहे. भू नावात काय आहे हे गावात गेल्याशिवाय नाही कळत.

तालुका - राजापूर 

बस स्थानक - राजापूर 

रेल्वे स्थानक - राजापूर 

योग्य काळ - वर्षभर 

रत्नागिरी जिल्ह्यात सुपारीच्या लागवडीसाठी प्रसिध्द असलेले हे गाव एका डोंगर उतारावर ‘भू’मातेच्या कुशीत वसलेले आहे. चारही बाजूनी असलेल्या डोंगर रांगा, घनदाट झाडी, आंबा, फणस, नारळ या बरोबरच सुपारीची अतिशय दाट लागवड, त्यामध्ये वसवलेली कोकणी कौलारू घरे, वर्षभर वाहणारा स्वच्छ नितळ पाण्याचा ओढा, सर्व बागांमधून पाटानी फिरवलेले पाणी आणि त्यामुळे सतत जाणवणारा गारवा... स्वप्नातीत वाटावे असे हे सर्व आपणास भू गावात अनुभवायला मिळते.

डिसेंबर नंतर सुपारी उतरवण्याच्या काळात जर आपण गेलो तर घरातील लहानथोर सर्व या कामात व्यस्त असतात. सुपारीच्या झाडावर चढून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्याचे त्यांचे कसब बघून अचंबित व्हायला होते. सुपारी उतरवल्यावर ती सोलणे, वळवणे आणि शेवटी फोडणे या सर्व कामासाठी घरातील लहान थोर सहभागी असतात.

भू गावाजवळ आर्यादुर्गा देवीचे सुंदर मंदीर आहे. मंदिराजवळ प्राचीन गूढ कातळशिल्पे आढळतात. मंदिरापासून १०० मीटर अंतरावर जांभ्यामध्ये खोदलेली अप्रतीम पायऱ्यांची  विहीर आहे. आणि या सगळ्या बरोबरच भू गावातील स्थानिकांचे आदरातिथ्य अनुभवून मन तृप्त होते.

अनुभवण्यासारखे खूप काही

गोवळकोट उर्फ गोविंदगड, चिपळूण

चला तर मग!

वेळासचा समुद्रकिनारा

चला तर मग!

परशुराम स्मारक

चला तर मग!
Positive SSL