गणपतीपुळ्याच्या सागरी किनाऱ्याबरोबरच इथे असलेले `वॅक्स म्युझियम` हे पर्यटकांसाठी अजून एक बघण्यासारखे ठिकाण आहे. अनेक सुपरिचित कलाकारांबरोबर भारतातील मान्यवर व्यक्तींचे अगदी हुबेहूब वाटणारे मेणाचे पुतळे इथे ठेवले आहेत. इथे केलेली रंगसंगती, प्रकाशयोजना यामुळे हे पुतळे सजीव वाटतात.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - गणपतीपुळे

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - वर्षभर 

खरीखुरी वाटणारी स्वप्नसुंदरी माधुरी दीक्षित अधिक सुंदर की दीपिका पदुकोन असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. इथला शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा पुतळा बघून तो खरच बोलू लागेल असे वाटत राहाते. खुर्चीत बसलेल्या श्री. बाळासाहेब ठाकऱ्यांचा पुतळा पाहून आदरयुक्त दरारा वाटतो तर `मोदी जॅकेट` घालून उभे असलेले `नरेंद्र मोदी` खूप खरेखुरे वाटतात. गणपतीपुळ्याला जाऊन देवळाची, समुद्रकिनाऱ्याची भटकंती केल्यावर या `वॅक्स म्युझियम`ला भेट देऊन एक मजेदार अनुभव घेता येतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

केशवराज मंदिर, आसूद

चला तर मग!

ओझरकडा धबधबा, राजापूर

चला तर मग!

धारेश्वर धबधबा, मार्लेश्वर

चला तर मग!
Positive SSL