मिऱ्या बंदर

शहरांत भगवती किल्ल्यावर शहराकडे तोंड करून उभे राहिल्यास एकाच वेळी उजवीकडे काळा समुद्रकिनारा तर डावीकडे पांढरा समुद्रकिनारा बघता येतो. काळ्या रेतीचा भाग म्हणजे मांडवी बंदर व पांढ-या वाळूचे बंदर म्हणजे मिरकरवाडा बंदर.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - रत्नागिरी

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - सप्टेंबर ते मे

मांडवी बंदरावर ‘गेट वे ऑफ रत्नागिरी’ असून त्या कमानीतून खोलवर गेलेली जेट्टी दिसते व पावले भटकंतीसाठी आपोआपचं तिकडे वळतात.थोडं पुढे गेल्यावर मिऱ्या बंदर लागते जिथून बोटी येत जात असतात व मासळीची चढउतार केली जाते. 

मिर्या बंदर येथे आता स्कूबा डायव्हिंग सेंटर सुरु झाले आहे. तेथून काही अंतरावर बोटीने नेऊन समुद्राखालील रंगीबेरंगी विश्वाची सैर घडवली जाते.  

हर्णे बंदर

दापोलीतील समुद्रकिनाऱ्यावर असेलेले हर्णे बंदर हे रत्नागिरीतील अनेक वैशिष्ट्यपूर्ण बंदरांपैकी एक आहे. किनाऱ्यावर ये-जा करणाऱ्या शेकडो रंगीबेरंगी बोटी, तऱ्हेतऱ्हेच्या मासळीने भरलेल्या टोपल्या, रंगीत साड्यां नेसून डोक्यावर फुले माळून सर्वत्र वावरणाऱ्या कोळणी, मासळी खरेदी करणारे व्यापारी आणि स्थानिक कोकणी माणसं असं दृश्य आपल्याला सकाळ-संध्याकाळ दररोज हर्णे बंदरावर दिसू शकतं. इथे रोज सायंकाळी चालणारा माशांचा लिलाव बघण्यासारखा असतो.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - सप्टेंबर ते मे

पूर्वीच्या काळी हर्णे हे जलमार्ग वाहतुकीतील एक महत्त्वाचे बंदर होते. आज मासेमारी हा इथला प्रमुख व्यवसाय असून वर्षभरात करोडो रुपयांची उलाढाल इथे होत असते. हर्णेमध्ये बघण्यासारखं अजूनही बरच काही आहे. इथल्या किनाऱ्यापासून एक मैल दूर, ऐन समुद्रात आठ एकराची जागा व्यापून उभा असलेला सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला बघण्यासारखा आहे.

हर्णे बंदराकडे जाताना वाटेत लागतो तो गोवा किल्ला. त्याच्या तटांवर उभे राहून समोरच्या पाण्यात दिसणारा सुवर्णदुर्ग व लाटांचा त्याच्या तटाशी चाललेला खेळ बघता येतो. इथून अस्ताला जाणारा सूर्य हा इतका रमणीय दिसतो, की अनेक निरनिराळ्या अँँगल्समधून तो टिपणे हे छायाचित्रकारांसाठी एक आव्हानच असते. इथून जवळच फत्तेगड किल्ल्याचे अवशेष दिसतात. आता मात्र या किल्ल्याच्या ठिकाणी कोळीवस्ती आहे. कनकदुर्ग व फत्तेगड हे दोन्हीही किल्ले सुवर्णदुर्गाचे उपदुर्ग आहेत.

मुसाकाजी बंदर

रत्नागिरी जिल्हयातील प्राचीन बंदरांपैकी एक असलेल्या मुसाकाजी बंदरचा परिसर अप्रतिम आहे. राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळील यशवंत गडाकडून ३ किमीअंतरावर आंबोळगडाच्या डावीकडील रस्त्यावर हे लहानसे बंदर आहे.

तालुका - राजापूर 

बस स्थानक - राजापूर 

रेल्वे स्थानक - राजापूर 

योग्य काळ - सप्टेंबर ते मे

परिसर अतिशय प्रसन्न असून समुद्राचे निळेशार पाणी, गोलाकार पुळण व मऊ रेती येणाऱ्या पर्यटकांना मोहवून टाकते. माणसांची फारशी वर्दळ नसलेल्या या बंदरावर निवांतपणा अनुभवता येतो. गेली अनेक वर्षे आता या बंदराचा वापर केला जात नाही. बंदराकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो.

अनुभवण्यासारखे खूप काही

गरम पाण्याचे झरे, उन्हवरे

चला तर मग!

लाडघर समुद्रकिनारा

चला तर मग!

नितांत सुंदर जांभरूण

चला तर मग!
Positive SSL