दापोली तालुक्यात लाडघर समुद्रकिनाऱ्याजवळ डोंगरउतारावर असलेल्या बुरोंडी गावात अपरांत भूमीचे स्वामी असणाऱ्या श्री परशुरामांचे सुंदर स्मारक उभे केले आहे. हा परिसरगर्द हिरवाईने वेढलेला असून दूरवर दिसणारा लाडघर समुद्रकिनारा इथल्या सौंदर्यात अजून भर घालतो.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - वर्षभर 

या पार्श्वभूमीवर पृथ्वीच्या गोलावर उभा असलेला परशुरामांचा कांस्यधातूप्रमाणे दिसणारा भव्य पूर्णाकृती पुतळा खूप उठून दिसतो. समुद्र सहा योजने मागे हटवून श्री परशुरामांनी कोकणाची निर्मिती केली अशी कथा आहे. त्यांच्या या भव्य व सामर्थ्यशाली पुतळ्याचे दर्शन घेतल्यावर मन आपोआपच त्यांच्या चरणी लीन होते.

जवळील प्रेक्षणीय स्थळे - पन्हाळेकाजी लेणी, उन्हवरे गरम पाण्याची कुंडे, लाडघर बीच, कर्दे व मुरुड बीच, केशवराज मंदीर - दापोली, आंजर्ले बीच व कड्यावरचा गणपती  अनुभवण्यासारखे खूप काही

निसर्ग संपन्न भू

चला तर मग!

गणेश मंदिर, गणेशगुळे

चला तर मग!

खेडची लेणी

चला तर मग!
Positive SSL