लहान मुलांसाठी आजकाल `मामाचा गाव` हे हक्काचं सुट्टी घालवायचं ठिकाण जवळपास संपुष्टात आलं आहे. परंतु अशा आपुलकीच्या ठिकाणाची गरज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. मनसोक्त हुंदडणं, मनासारखं खाणं-पिणं, झोपाळ्यावर खेळणं ह्या आनंददायी गोष्टी अनुभवायच्या असतील तर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ इथल्या `मामाच्या गावाला` भेट द्यायलाच हवी.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - गणपतीपुळे

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - वर्षभर 

जुन्या काळातील कौलारू कोकणी घर, कौलांमधून सारवलेल्या जमिनीवर पडणारे उन्हाचे कवडसे, सारवलेल्या कुडाच्या भिंती, घराची प्रशस्त पडवी अशा गतकाळातील वैभवाचा आनंद घेत असताना इथे जाणवणारी शांतता, निवांतपणा हे सर्व अनुभवण्यासारखं असतं.

या `मामाच्या घरी` कोकणी जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेता येतो. त्याचबरोबर सुंदर कलाकुसर असलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण कोकणी वस्तूंचे दालनही इथे पाहाण्यासारखे आहे. कोकणाची आठवण म्हणून नेण्यासाठी अनेक वस्तू इथे अगदी वाजवी किमतीत मिळू शकतात. तुरळ येथील `मामाच्या घरी` घेतलेला हा पाहुणचार परत परत घ्यावा असाच आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

महर्षी कर्वे स्मृती स्मारक, मुरुड

चला तर मग!

जांभा खाण

चला तर मग!

केशवसुत स्मारक, मालगुंड

चला तर मग!
Positive SSL