रत्नागिरी जिल्हा निसर्ग सौंदर्याने समृद्धच आहे. मात्र एरवीच्या नेहेमीच्या ट्रीप मध्ये जो अनुभव आपल्याला येऊ शकत नाही असा अनुभव आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सुरु झालेल्या निसर्ग पर्यटन केंद्रांमध्ये मिळतो.

बाजूला छान खाडी असावी, पावसाळ्यात गेल्यास आस पास हिरवीगार भात शेती असावी किंवा गर्द आमराई असावी, सकाळी जाग यावी ती मोराचा केकारव ऐकून आणि तो अस्सा खिडकीतून बाहेर दिसावा, दिवसभर निरनिराळे साहसी खेळ खेळावेत, सकाळ संध्याकाळ मस्त गरम गरम कोकणी घरगुती जेवणावर ताव मारावा, आसपास असलेल्या कोकणी जीवनाचा आनंद घ्यावा, जवळच असलेल्या निर्मनुष्य स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर मउशार वाळूतून अनवाणी भटकावे, आणि रात्री अक्षरश: १८० कोनात या क्षितिजा पासून त्या क्षितीजा पर्यंत पसरलेल्या, अगणित ग्रह-ताऱ्यानी ओसंडणाऱ्या विस्तीर्ण आकाशात हरवून जावे.

राजापूर तालुक्यातील नाटे येथे रानडे फार्म वर वर्षातील निरनिराळ्या ऋतूंमध्ये हे सर्व आपणास अनुभवता येते.

किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यात आता बऱ्याच ठिकाणी सुरु झालेल्या निरनिराळ्या निसर्ग पर्यटन केंद्रांमध्ये कमी अधिक प्रमाणात आपणास हा अनुभव घेता येतो. वन्यप्राणी आणि पक्षांची आवड असणाऱ्यांसाठी तर ही केंद्रे म्हणजे पर्वणीच आहेत. जवळजवळ ६ फूट पसरणाऱ्या पंखांवर स्वार होऊन आकाशात भरारणाऱ्या पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडा पासून ते विशिष्ट अधीवासाचे प्रतीक असलेल्या स्वर्गीय नर्तका पर्यंत शेकडो प्रकारचे पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे, वनस्पती यांचे निरीक्षण करण्याची संधी या निसर्ग पर्यटन केंद्रांमध्ये आपल्याला मिळते.

अनुभवण्यासारखे खूप काही

धनगरी नृत्य (गजा नृत्य )

चला तर मग!

कनकादित्य मंदिर, कशेळी

चला तर मग!
Positive SSL