गुलाबाच्या पाकळ्या उलगडत गेल्यावर जसे फुलाचे सौंदर्य अधिक खुलते तसे रत्नागिरी जिल्ह्याचे आहे. रत्नागीरी मध्ये जरा आड वाटाने फिरा, रत्नागिरी जिल्ह्याचे अंतरंग अजून खुलत जातील. इथली अजूनही अनेक ठिकाणे सामान्य पर्यटकांना माहीतच नाहीत. असेच एक सर्वांग सुंदर ठिकाण म्हणजे जांभरूण. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी येथील हातखंब्याजवळच निवळी फाटा आहे. हा रस्ता सरळ गणपतीपुळे येथे जातो. याच रस्त्यावर साधारण १४ कि. मी. अंतरावर एक रस्ता  जांभरूण कडे जातो.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - रत्नागिरी

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - वर्षभर 

निसर्गदेवतेने दोन्ही हाताने आपला खजिना जांभरूण वर रिकामा केला आहे. दाट जंगलाने व्यापलेला हा परिसर अक्षरशः अफलातून आहे. पावसाळ्यानंतर लगेच जर जांभरूण ला गेलात तर त्या दरी मधून खळाळत वाहणारा ओढा, दोन्ही बाजूस डोंगर उतारावर असलेली भातशेती, दाट जंगल, सतत ऐकू येणारे निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज, दाट झाडीतून गेलेल्या जांभ्याच्या चिऱ्याच्या पाखाडी, आंब्याच्या बागांमध्ये लपलेली सुंदर कोकणी घरे... सारे काही वेड लावणारे. इथल्या ओढ्याला जवळ जवळ मे महिन्या पर्यंत पाणी असते.

नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत कल्पकतेने वापरून स्थानिकांनी सर्व बागामधून पाटाने पाणी फिरवले आहे. दाट जंगलाचे सूचक असलेला मलाबार धनेश पक्षी इथे मोठ्या प्रमाणात दिसतो. जवळच असलेल्या जांभ्याच्या सड्यावर गूढ कातळशिल्पे कोरलेली आढळतात. या छोट्या गावात काही खाजगी प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. मूर्ती अभ्यासकांसाठी या देवळातील मूर्ती हा एक उत्कंठेचा विषय होऊ शकतो. हे सर्व पाहिल्यावर इथे जर मुक्काम  करण्याचा मोह झाला नाही तरच नवल. या साठी जांभरूण गावात होम स्टे सुद्धा उपलब्ध आहेत. रत्नागिरी पर्यटन कार्यक्रमात जांभरूण गावाला दिलेली भेट अविस्मरणीय ठरते यात शंकाच नाही.

अनुभवण्यासारखे खूप काही

गणेशोत्सव

चला तर मग!

रत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी

चला तर मग!

निवळीचा धबधबा, रत्नागिरी

चला तर मग!
Positive SSL