रत्नागिरी शहरात डॉ. बाबासाहेब सावंत कोकण विद्यापीठाच्या अधिपत्याखालील मत्स्य महाविद्यालयाचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नदुर्ग किल्ल्याजवळ आहे. येथे खाऱ्या व गोड्या पाण्यातील विविध प्रकारचे मासे व इतर जलचर यांचे संग्रहालय आहे.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - रत्नागिरी

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - वर्षभर 

घोडमासा, कोंबडामासा, ट्रिगरमासा, समुद्री काकडी, शेवंड, तारामासा, ऑक्टोपस, समुद्री कासवे, समुद्री साप अशा अनेक नमुन्यांबरोबरच सुमारे १३०० समुद्री जिवांचे नमुने असलेले हे मत्स्यालय पर्यटकांबरोबरच अभ्यासकांचेही आकर्षण ठरले आहे. त्या शिवाय शिंपल्यांचे २५० हून जास्त प्रकार इथे ठेवले आहेत.

येथील प्रमुख आकर्षण म्हणजे ५५ फूट लांबीचा आणि सुमारे ५ हजार किलोग्रॅम वजनाचा भीमकाय देवमाशाचा सांगाडा. सर्वांना आवडेल असे आवर्जून पाहाण्यासारखे हे ठिकाण आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

दुर्गादेवी मंदिर

चला तर मग!

गिरीभ्रमण

चला तर मग!

कनकादित्य मंदिर, कशेळी

चला तर मग!
Positive SSL